CM Uddhav Thackeray : येत्या काही दिवसांत लोकलच्या बाबतीत निर्णय घेतला जाईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बेस्टच्या वर्धापन दिनी मनःपूर्वक शुभेच्छा. सर्व वाहक-चालक, बेस्ट कर्मचारी यांना त्यांच्या अविरत सेवेबद्दल धन्यवाद देतो व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो
कोरोनाच्या काळात बेस्टने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच प्रवासी यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली व कुठेही अडचण येऊ दिली नाही
जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली. कोरोना काळात बेस्ट अधिकारी आणि कर्मचारी देखील कारोनाग्रस्त झाले, काहींचे मृत्यू झाले पण तरीदेखील बेस्ट थांबली नाही.
बेस्ट आणि लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे
गेल्या काही काळापासून निसर्गचक्र बदलते आहे. आपलं पर्यावरण जपलं गेलं पाहिजे.
इलेक्ट्रिक बस हे बेस्टचे क्रांतिकारक पाऊल
माहीम बस डेपोचे आधुनिकीकरण आल्याने देखील कर्मचाऱ्यांना मोठी सुविधा होणार आहे आणि प्रवाशांना देखील दिलासा मिळणार आहे.
आम्ही आमच्या वचननाम्यात म्हटलं होतं त्याप्रमाणे सर्व प्रकारच्या बेस्ट बस आणि लोकल प्रवासासाठी एकच पास किंवा तिकीट यापुढे यापुढे चालावे असे नियोजन
शिस्तबद्ध सेवा ही बेस्टची ख्याती आहे
हळूहळू कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर येते आहे
एकेक गोष्टींवरचे निर्बंध आपण सावधगिरी घेऊन शिथिल करतो आहोत
कालच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चे मालक भेटून गेले व त्यांनी वेळेची शिथिलता द्यावी अशी विनंती केली आहे. लोकलच्या प्रवासासंदर्भात देखील निर्णय घ्यायचा आहे
आपण हे सर्व काही करणार आहोत फक्त पुरेशी काळजी घेऊ
कोरोना उलटणार तर नाही ना हेही आपणास पहावे लागणार आहे
येत्या काही दिवसांत लोकलच्या बाबतीतही निर्णय घेतला जाईल
बेस्टच्या कोणत्याही कामात काही अडचण आल्यास सरकारकडून आवश्यक ते केल्याशिवाय राहणार नाही























