एक्स्प्लोर
Kalyan : कल्याण : रेतीबंदर परिसरातील अचानक पाणीपातळीत वाढली
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील रेतीबंदर परिसरात अचानक पाणीपातळी वाढली. त्यामुळे रात्री २ च्या सुमारास तात्काळ तबेले मालकांनी आपल्या म्हशी रस्त्यावर आणल्या असून किमान एक हजार ते बाराशे म्हशी काढण्यात आल्या आहेत. अचानक खाडीतील पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे इथे पूरस्थिती निर्माण झालीए. कचौरे कोळीवाडा येथील सागरदेवी मंदिर आणि शेड १० फूट पाण्याखाली गेलंय. त्यामुळे आता रेतीबंदर परिसरातील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय.
आणखी पाहा





















