Deepali Sayyad Full : सुषमा अंधारे यांच्या एन्ट्रीनंतर दिपाली सय्यद शिंदे गटात जाणार?
Deepali Sayyad : शिवसेना (Shiv Sena) विभागली गेली, शिवसेनेत दोन गट पडले आणि अशावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सिलेब्रिटी चेहरा असलेल्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) आणि उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) गेल्या कुठे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शिंदे गट बाजूला झाल्यानंतर आणि शिवसेनेत फूट पडण्याआधी सुद्धा दीपाली सय्यद, उर्मिला मातोंडकर राजकारणात अॅक्टिव्ह होत्या. मात्र असं अचानक काय झालं या दोघी राजकारणात इतक्या घडामोडी सुरु असताना शांत झाल्या आहेत? तर दुसरीकडे ठाकरे गटात वादळी भाषण, वक्तव्य करणारा चेहरा सुषमा अंधारे यांच्या रुपात समोर आला आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांच्या झंझावातापुढे उर्मिला मातोंडकर, दीपाली सय्यद गेल्या कुठे? त्या सध्या काय करत आहेत? असे प्रश्न विचारले जात आहेत.






















