Bhiwandi अखेर राजीव गांधी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी तीन वर्षानंतर मुहूर्त मिळाला ABP Majha
भिवंडी वाडा मार्गावरील भिवंडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्व राजीव गांधी उड्डाणपुलाची दुरावस्था झाली असताना त्याच्या दुरुस्ती साठी मागील कित्येक दिवसां पासून हा उड्डाणपूल अवजड वाहतुकीस बंद होत .नुकताच या उडफणपुलाच्या कामास पालिकेने मंजुरी दिल्यानंतर महापौर प्रतिभा पाटील यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र मायने उपस्थित होते .
उड्डाणपुलाची दुरुस्ती होत असताना संपूर्ण उड्डाणपूल चार महिन्यासाठी वाहतुकी करीता बंद राहणार असल्याने शहरातील नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे तर शहरातील अवजड वाहतूक पूर्ण बंद करून ती पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून त्या मार्गांचा अवलंब वाहन चालकांनी करावा असे आवाहन वाहतूक विभागा तर्फे रवींद्र मायने यांनी केले आहे .
या उड्डाणपुलाचा भाग कोसळल्या नंतर पालिका प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी हा उड्डाणपूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला होता त्यानंतर अनेकवेळा दुरुस्ती चे काम हाथी घेण्यात आले मात्र ते सुरू झालेच नाही ,दोन महिने उड्डाणपूल दुरुस्ती कामी बंद राहणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले होते परंतु त्यानंतर ही दोन दिवस व्यवस्था होऊ न शकल्याने अखेर दोन दिवस उशिरा का होईना उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामास प्रारंभ झाला असून त्यामुळे खालील रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्यास प्रारंभ झाला असल्याने पालिका अतिक्रमण विभागाने या रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्यांवर कारवाई करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरीकांनी दिली आहे .