Aryan Khan Bail Granted : आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर मन्नत बंगल्याबाहेर चाहत्यांचा जल्लोष
अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन दिलाय. या सुनावणीकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी ‘मन्नतवर’ जाणार हे स्पष्ट झालंय. आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे न्यायालयात हजर होते. तिन्ही आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केलाय. क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी कोठडीत असलेला आर्यन खान २५ दिवसांनी कोठडीतून बाहेर येणार आहे. आर्यनला जामीन मिळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी शाहरुखच्या मन्नत बंगल्याबाहेर गर्दी केली,.,, शिवाय चाहत्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.





















