![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Anil Deshmukh at ED : नॉट-रिचेबल असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल..
गेल्या बऱ्याच काळापासून नॉट रिचेबल असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या रिचेबल झाले आहेत. अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले असून ते आपला जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अनिल देशमुख ईडीच्या रडारवर आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं आणि 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पण हे दोघेही तपास यंत्रणांच्या हाती मात्र लागत नव्हते. चार ते पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख ईडीसमोर हजर न राहिल्यामुळं त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसेच अनिल देशमुखांचा शोध घेण्यासाठी ईडीनं सीबीआयकडे मदत मागितली होती. अशातच आज अनिल देशमुख स्वतः ईडीसमोर आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहिले आहेत.
![Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/a827990bf873a3543e6251e6121818a0171994551074090_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Acharya Maratha College : आचार्य मराठा काॅलेजमध्ये जीन्स , टीशर्ट , जर्सीलाही बंदी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/b22376e6261c6fd02658efd319f84f591719894260613719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Anil Parab :मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परबांची विजयी आघाडी Mumbai Graduate Constituency Election](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/9441b43564a2e4ca476cc6f2bb206c56171984777690990_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Abu Salem : गँगस्टर अबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/c25ae30f984923b356141cf1389633f61719726693653719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Anil Parab vs Manisha Kayande : अनधिकृत होर्डिंग्जवरून वादंग; मनिषा कायंदे, अनिल परब भिडले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/5a4985ee684843b9bb14e4c0fe72bdc81719649631385719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)