Zero Hour Yugendra Pawar : अमेरिका ते बारामती, युगेंद्र पवारांचा प्रवास Exclusive
Zero Hour Yugendra Pawar : अमेरिका ते बारामती, युगेंद्र पवारांचा प्रवास Exclusive
कोण आहेत युगेंद्र पवार?
अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे युगेंद्र पवार चिरंजीव
युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार
शरयु ग्रुपच्या माध्यमातून युगेंद्र पवार व्यवसायामध्ये सक्रिय
फलटण तालुक्यातील शरयू शुगर कारखाना युगेंद्र पवार पाहतात
बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत युगेंद्र पवार
सध्या त्यांना त्या पदावरून काढल्याची चर्चा आहे
............
मा श्री युगेंद्र (दादा) श्रीनिवास पवार
▪️ प्रसिद्ध उद्योगपती श्री श्रीनिवास अनंतराव पवार व शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा सौ शर्मिला (वहिनी) श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव
▪️जन्म - 22 एप्रिल 1991
▪️ शिक्षण- माध्यमिक शिक्षण मुंबईच्या कॅथेड्रल स्कुल मध्ये तर उच्च शिक्षण अमेरिकेतील नॉर्थ ईस्टर्न विद्यापीठ बोस्टन येथे झाले असून फायनान्स व इन्शुरन्स विषयात पदवी घेतली आहें.
▪️गेल्या पाच वर्षापासून शरयू उद्योग समूहामध्ये विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या त्यामध्ये फलटण येथील शरयु साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पदावर काम करून साखर उद्योग क्षेत्रात यशस्वी पदार्पण
▪️भारताचे मा कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय शेती उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्रात प्रथमच महाराष्ट्र ऑरगॅनिक अँड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन अर्थात मोर्फा संस्थेची स्थापना केली
▪️ शिक्षण क्षेत्रातील नामांकित अशा विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या खजिनदार पदी नियुक्ती.
▪️मे 2022 मध्ये बारामती तालुका कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
▪️ डिसेंबर 2023 व एप्रिल 2023 मध्ये बारामती मध्ये प्रथमच भव्य असे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे यशस्वी आयोजन केले यामध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्लांचा सहभाग
▪️बारामती व परिसरामध्ये सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य क्रीडा शेती जलसंधारण क्षेत्रात सतत कार्यरत.
नैसर्गिक संकटात नागरिकांना आर्थिक मदतीचा हात
▪️शरयू फौंडेशनच्या माध्यमातून हजारो अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यांना पोकलेन मशीनद्वारे विहिरींची मोफत खोदाई करून देण्यात आली असून शेकडो ओढ्यांचे खोलीकरण करण्यात आले आहें.
▪️दुष्काळी परिस्थितीमध्ये बारामतीच्या पश्चिम भागातील कायम पाणीटंचाई असणाऱ्या शेकडो गावांना शरयू फौंडेशनच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणीपुरवठा.
▪️कला क्रीडा साहित्य आदि क्षेत्रात काम करणाऱ्या इच्छुक तरुण-तुरुणींना भरीव आर्थिक मदत व मार्गदर्शन लाभत असून आज अनेक मुले यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करीत आहेत.
▪️गावोगावच्या सतत येणाऱ्या अडचणी त्यामध्ये लाईट रस्ते पाणी घरदुरुस्ती वादळी वारे पाऊसकाळात होणारे नुकसान यासाठी अविरत कार्यरत, तर सरकारी योजना पोहोचण्या आधीच शरयु फौंडेशन च्या माध्यमातून व स्वनिधीतून हजारो गरजूंना मदतीचा हात दिला आहे.