Zero Hour on Rohit Sharma : कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह, रोहित-विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्त व्हावं?
Zero Hour on Rohit Sharma : कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह, रोहित-विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्त व्हावं?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा चौथा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 184 धावांनी मोठा विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली असून मालिकेत अजून एक सामना बाकी आहे, जो 3 जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडियाला चौथ्या डावात 340 धावांचे लक्ष्य मिळाले होते, ज्याचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण डाव 155 धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 84 धावा केल्या.ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पहिल्या डावात 369 धावा केल्या होत्या. नितीश रेड्डी यांच्या शतकी खेळीमुळे भारताला फॉलोऑन वाचवण्यात यश आले. दुसऱ्या डावाची वेळ आली तेव्हा कांगारू संघाने 234 धावा केल्या, त्यामुळे चौथ्या डावात भारताला 340 धावांचे मोठे लक्ष्य मिळाले होते. पण टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.