Zero Hour ABP Majha : प्रेमाच्या नावानं बळी घेणाऱ्यांना कोणती शिक्षा? तरुणाईला काय वाटतं?
शिळफाटा येथील डोंगरात तीन पुजाऱ्यांनी एका विवाहित महिलेवर अत्याचार करून तिची हत्या केली होती. मंदिरातील पुजारी असलेल्या तीन आरोपींनी विवाहित महिलेला चहामधून गुंगीचे औषध देत हा प्रकार केला होता. याप्रकरणी मूळच्या यूपीच्या असलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे विवाहित महिलेचा छळ केल्याप्रकरणी तिच्या सासरच्या लोकांवरही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.कोपरखैरणे येथील माहेर आणि सीबीडी येथील सासर असलेल्या विवाहित महिलेची शिळफाटा मंदिरातील पुजाऱ्यांनी हत्या केल्याची धक्कादायक प्रकार घडला होता. 6 जुलै रोजी सीबीडीतून घर सोडून गेलेल्या महिलेची 10 जुलै रोजी शिळफाटा येथे हत्या झाल्याचे समोर आले.



















