Narendra Dabholkar : डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील साक्षीदारांनी मारेकऱ्यांना ओळखलं
abp majha web team
Updated at:
20 Mar 2022 10:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील साक्षीदारांनी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना ओळखले आणि या दोघांनीच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचे न्यायालयात सांगितले. हे दोन्ही साक्षीदार पुणे महापालिकेचे सफाई कर्मचारी असून त्यापैकी एक पुरुष तर एक महिला आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची 20 ऑगस्ट 2013 ला पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.