TOP 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : ABP Majha
TOP 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : ABP Majha
शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती, राज्य शासनाकडून अधिकृत अधिसूचना जारी.
महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी भाजपकडून 13 बाहेरील नेत्यांची जबाबदारी, हे नेते प्रत्येक जागेवर भाजपची रणनीती बनवतील.
विनोद तावडेंच्या नेतृत्वात भाजपचा नवा विक्रम, भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानात १८ दिवसात ४ कोटी सदस्य.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आमदारांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करा, आमदार सतीश चव्हाण यांची मागणी
लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांकडून मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तू अर्पण, या वस्तूंचा उद्या सायंकाळी सहा वाजता लिलाव होणार, लालबागच्या राजाच्या मंडपात लिलाव आयोजित.
म्हाडा नंतर आता सिडकोही घरांच्या किंमती कमी करणार.सध्याच्या किंमती मध्ये १० टक्यांची कपात, ५ ते ६ लाख रूपयांनी घरांच्या किंमती कमी होणार.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला कोणत्याही क्षणी अटक होणार, भोईसर पोलीस ठाण्यात अक्षय शिंदेवर अनैसर्गिक लैंगिक संबंध अन्वये गुन्हा दाखल.