Maharashtra Government Job: नोकर भरतीसंदर्भात शासन निर्णायामध्ये नेमकं काय आहे? कुठे किती जागा?
Maharashtra Government Jobs : 75 हजार पद भरतीमधील मोठा अडथळा दूर झाला आहे. राज्य सरकारनं आज शासन निर्णय जारी करत नियम शिथील केले आहेत. कोरोना महामारीमुळे नोकर भरतीला घातलेली 50 % ची मर्यादा शिथिल करत आता शंभर टक्के नोकरभरती करता येणार असल्याचा निर्णय राज्य सरकरने घेतलाय. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षात राज्यात 75 हजार नोकर भरती केली जाणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णायामुळे शासनाच्या 29 विभागातील 75 हजार पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने या संदर्भातला शासकीय आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार सरकारनं ज्या विभागाचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला आहे, अशा ठिकाणी सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100% भरण्याची मुभा दिली आहे.



















