WEB Exclusive : Javed Akhtar यांनी कुठेही तालिबानचं समर्थन केलेलं नाही, सुधीर पाठक यांचं मत
ज्येष्ठ संघ विचारक आणि तरुण भारत या दैनिकाचे माजी संपादक सुधीर पाठक यांनी जावेद अख्तर यांचे वक्तव्य पूर्ण अर्थाने पाहिले पाहिजे, त्यांचे वक्तव्य अत्यंत चांगले वक्तव्य आहे, त्यांनी कुठे ही तालिबान चे समर्थन केलेलं नाही, उलट भारतातील जे मुस्लीम तालिबानचा समर्थन करतात त्यांच्यावर टीका केली आहे.. आणि त्या अर्थाने त्यांचे वक्तव्य स्वागतार्ह आहे असे सुधीर पाठक म्हणाले...
दरम्यान जावेद अख्तर यांची मुलाखत ज्या वाहिनीवर घेण्यात आली त्या वाहिनीवर त्यांच्या वक्तव्याला दुसऱ्या अर्थाने प्रसिद्ध करण्यात आले असावे अशी शक्यता आहे सुधीर पाठक यांनी व्यक्त केली. ज्या अर्थी जावेद अख्तर यांनी भारतात राहून तालिबान चे समर्थन करणाऱ्या कडवट मुस्लिम विचारसरणी वर जी टीका केली आहे ती आवश्यक होती... आणि त्यांच्या म्हणण्याचा तोच गाभा आहे, असे सुधीर पाठक म्हणाले...



















