WEB EXCLUSIVE | सहा महिन्यांनी पर्यटकांनी बहरलं विदर्भाचं नंदनवन;पाहा नयनरम्य चिखलदरा कसं आहे?
दऱ्याखोऱ्यात वसलेलं चिखलदरा आणि देशातील महत्त्वाच्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प ही याच ठिकाणी आहे. नुकताच परतीचा पाऊस येऊन गेल्याने चिखलदऱ्यावर संपूर्ण धुक्याची चादर पसरल्याने वातावरण अल्हाददायक झाल आहे. या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक आता चिखलदरा येथे येऊ लागले. चिखलदरा येथील शक्कर तलाव पावसामुळे पूर्णता भरल्याने याठिकाणी बोटिंग आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली आहे.
सद्या विदर्भात परतीचा पाऊस पडतोय. या पावसामुळे चिखलदर्याच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. हिरवीगार उंच झाडे, त्यात सकाळच्या वेळी पडलेलं धूक. सद्या या ठिकानी पर्यटनाला सुरुवात झाली असल्याने सकाळची नयनरम्य धुक्याची दृश्य बघण्यासाठी पर्यटक सकाळी चिखलदरा येथे दाखल होत आहे. देवी पॉईंट जवळ असलेल्या तलावामध्ये पर्यटक जास्त गर्दी करत आहेत. तलावातील जहाजमध्ये पर्यटक बसण्यागोदर तोंडाला मास्क, लाईफ जॅकेट ला पूर्ण सॅनिटाइज करून त्यानंतर जहाजमध्ये पर्यटकांना बसता येत आहे. कोरोना काळात योग्य ती खबरदारी चिखलदरा पर्यटन स्थळावर घेतली जाते.