निम्न पैनगंगा धरणातील अतिरिक्त पाणी वापरास मंजुरी, जलसंपदा मंत्री जयंत पाटलांचा मोठा निर्णय
मराठवाड्यातील निम्न पैनगंगा धरणापर्यंतच्या 44.54 टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी मिळाली. जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी हा दिलासादायक निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे यवतमाळ, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील काही भागांना अधिकचं पाणी उपलब्ध होईल असंही पाटलांनी म्हटलंय. या निर्णयामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळेल. गोदावरी पाणी तंटा लवाद्यात निम्न पैनगंगा धरणापर्यंतचे पाणी वापरण्यास मुभा आहे. मंजूर अतिरिक्त पाण्याचा वापर पूस, अरूणावती आणि उर्ध्वपैनगंगा प्रकल्पांच्या खालील भागात करण्यात येणार आहे. या मान्यतेनुसार उर्ध्व पैनगंगा ते निम्न पैनगंगा मधील क्षेत्रामध्ये सुमारे 44.54 टीएमसी पाणी पुढील नियोजनासाठी उपलब्ध होणार आहे, असे त्यांनी सांगितले.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
