एक्स्प्लोर
kailas Pati On Votescam : दुबार मतदार कोण हे समोर येऊ द्या, भाजप माहिती लपवतंय
बोगस मतदारांच्या (Bogus Voters) मुद्द्यावरून राजकारण तापले असून, ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांनी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'प्रत्येक गोष्ट जातीवर, धर्मावर न्यायची ही भाजपची (BJP) जुनी रीत आहे,' असा हल्लाबोल कैलास पाटील यांनी केला. केवळ हिंदू दुबार मतदार दिसतात का, मुस्लिम का दिसत नाहीत, या शेलारांच्या आरोपावर बोलताना पाटील म्हणाले की, दुबार मतदार हिंदू असो वा मुस्लिम, तो काढलाच गेला पाहिजे. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असताना त्यांनीच मतदार यादी पडताळणी मोहीम हाती घ्यावी, असे आव्हानही त्यांनी दिले. तुळजापूरमध्ये (Tuljapur) बोगस मतदार नोंदणी प्रकरणी निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल करूनही अद्याप तपास का पूर्ण झाला नाही, याचे उत्तर भाजपने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















