एक्स्प्लोर
Pune विद्यापीठात 'Voice of Devendra' वक्तृत्व स्पर्धेमुळे वाद,परिपत्रक मागे, Rohit Pawar यांचा विरोध
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 'वॉईस ऑफ देवेंद्र' या नावाने वक्तृत्व स्पर्धेचे परिपत्रक जाहीर केले होते. या परिपत्रकावरून मोठा वाद निर्माण झाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी ट्वीट करून या स्पर्धेला तीव्र विरोध दर्शवला. त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीनेही आंदोलनाची हाक दिली. मोठ्या विरोधानंतर विद्यापीठाने हे स्पर्धेचे परिपत्रक मागे घेतले. प्राध्यापक सदानंद भोसले यांनी बाहेर येऊन विद्यार्थ्यांना तसे पत्र दिले. विद्यार्थ्यांनी या प्रकाराला 'हा उघडपणे राजकीय व्यक्तिपूजेचा प्रकार आहे. शिक्षण संस्थांना राजकारणाचं केंद्र बनविण्याचा प्रयत्न कधीच सहन केला जाणार नाही' असे सांगत आंदोलन केले. या स्पर्धेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने किंवा संबंधित विभागाने केले नव्हते, तर स्वारंभ फाऊंडेशन नाशिक प्रतिष्ठान आणि आय एफ ई डबल एल ओ डब्ल्यु फाऊंडेशन या संस्थांनी केले होते, असे स्पष्टीकरण नंतर देण्यात आले. रोहित पवार यांनी ही स्पर्धा पुणे विद्यापीठाने आयोजित केली असल्याचा दावा केला होता, जो नंतर खोटा ठरवण्यात आला.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















