Sanjay Raut Tweet : संजय राऊतांनी शेअर केलेला व्हिडिओ 2017 सालचा मराठा मोर्चाचा?
संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या कालच्या मोर्चातील गर्दीबाबत ट्विट केलेल्या व्हिडीओवरुन आता नवा वाद होण्याची शक्यता आहे... हा व्हिडीओ कालच्या महाविकास आघाडीच्या मोर्चातला नसून मराठा मोर्चातला असल्याचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.. तसंच संजय राऊत अधूनमधून असं करत असतात, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला... आता यावरुन मराठा क्रांती मोर्चा आणि भाजप आक्रमक झालीय... मराठा क्रांती मोर्चानं संजय राऊतांचं तोंड काळं करु असा इशारा दिलाय... तर दुसरीकडे भाजपनं संजय राऊतांची शिवसेनेतून हकालपट्टी करावी अशी मागणी केलीय... त्यामुळे आता वादाचा मोर्चा संजय राऊतांकडे वळलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.





















