Vidarbha Floods : पश्चिम विदर्भात पावसाचं थैमान, 4 दिवसात पावसामुळे 29 जण दगावले
Vidarbha Floods : पश्चिम विदर्भात पावसाचं थैमान, 4 दिवसात पावसामुळे 29 जण दगावले
18 जुलै ते 22 जुलै या चार दिवसात पश्चिम विदर्भात अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे मोठा हाहाकार माजवला होता, अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्याचा प्राथमिक अहवाल जाहीर केला आहे. या चार दिवसात तब्बल वीज पडून, पुरात वाहून आणि भिंत कोसळून अश्या 29 नागरिकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आले आहे. चार दिवसात तब्बल 29 जणांनी आपला जीव गमावला तर 3 लाख 48 हजार हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान झाले आहेत. तसेच 10 हजार 380 घरांची पडझड झाली आहे. सोबतच पुरात अडकलेल्या 2191 कुटुंबातील 7306 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.




















