Solapur Police Action : सोलापूरमध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची वाहनं जप्त, पोलिसांची कडक कारवाई
Break The Chain Maharashtra : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. बुधवारी म्हणजेच, काल रात्री 8 वाजल्यापासून राज्यात 144 कलम लागू करण्यात आलं आहे. असून पुढील 15 दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याला 'ब्रेक द चेन' असं नाव देण्यात आलं आहे. आज ब्रेक द चेन (Break The Chain) या निर्बंधाचा पहिला दिवस आहे. पुढील 15 दिवस म्हणजे 1 मे पर्यंत राज्यात कलम 144 लागू असणार आहे. त्यामुळे विनाकारण कुणालाही बाहेर फिरता येणार नाही.



















