Kartiki Ekadashi 2021 : कार्तिकी यात्रेसाठी वारकऱ्यांमध्ये उत्साह, यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात
पंढरपूर यात्रेची आस लागलेल्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावर्षी कार्तिकी यात्रेला जिल्हाधिकाऱ्यांनी सशर्त परवानगी दिली आहे. नियम आणि अटींचं पालन करून 15 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा करण्यात येणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा होणार आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे यात्रेची प्रतीक्षा करणाऱ्या वारकऱ्यांना यावेळी पंढरपूरच्या यात्रेला जाता येणार आहे. या यात्रेला किमान 5 ते 6 लाख भाविक येतील अशी अपेक्षा असून त्यादृष्टीनं दर्शन व्यवस्था करण्यात आलीय. कार्तिकी वारीच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार आहे.




















