TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 18 June 2024 : ABP Majha
याच आठवड्यात राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मंत्री मंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती
विधान परिषदेतील 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीसंबंधी उच्च न्यायालयात आज सुनावणी, नियुक्त्या मार्गी लावण्याच्या प्रक्रियेत सरकारने खोडा घातल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप.
सध्याच्या सरकारची निर्मितीच शहरी नक्षलवाद आहे, मोदी,शाह आणि फडणवीस यांचा दहशतवाद आणि नक्षलवाद यात अंतर नाही, सामना वर्तमान पत्रातून हल्लाबोल.
आज दिल्लीमध्ये भाजपची बैठक, बैठकीसाठी महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार.
लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने तसेच आगामी विधान सभा डोळ्यासमोर ठेवून भाजप कोअर कमिटीत चर्चा होण्याची शक्यता, याच सोबत राज्यात काही महत्वाचे बदल होण्याची शक्यता.
आज दिल्लीमध्ये भाजपच्या कोअर कमिटीची बैठक, बैठकीला पंकजा मुंडेही उपस्थित राहण्याची शक्यता..