TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 21 May 2024: ABP Majha
मतदानाच्या गैरसोयीची मुख्यमंत्री शिंदेंकडून दखल, मुख्य सचिव नितीन करीर यांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश
उद्धव ठाकरेंच्या बोटाला हिरवी शाई, कमी मतदानाच्या मुद्द्यावरुन निवडणूक आयोगावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर आशिष शेलारांचा हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माझा शंभर टक्के प्रचार केला नाही, मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंची खदखद, प्रचार न करणाऱ्यांची नावं अजित पवारांना दिल्याचीही माहिती
पुण्यातील रॅश ड्रायव्हिंगप्रकरणी राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश, तर आरोपी मुलाच्या वडिलांसह आतापर्यंत ७ जणांना अटक
पुणे अपघात प्रकरणात आऱोपीला प्रौढ ठरवण्याचा आणि रिमांड होम मिळवण्याचे दोन्ही अर्ज कोर्टानं फेटाळले, पुणे पोलीस आयुक्तांची माहिती तर राजकीय दबाव नसल्याचंही केलं स्पष्ट
यंदा राज्याचा बारावीचा ९३.३७ टक्के निकाल, कोकण विभाग अव्वल तर यंदाही निकालात मुलींची बाजी, दुपारी एक वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार
मराठवाड्यात जलसाठ्यांनी तळ गाठला, हिंगोलीत भर उन्हात पाण्यासाठी तारेवरची कसरत, टँकरमधून विहिरीत सोडलेल्या पाण्यासाठी महिलांसह लेकरांची झुंबड
आचारसंहितेचे नियम शिथिल करुन चारा उपलब्ध करुन द्या, अंबादास दानवेंची मागणी, तर अनेक जिल्ह्यात ४५ दिवस पुरेल एवढा चारा, मंत्री विखे पाटलांचा दावा
आचारसंहितेचे नियम शिथिल करुन चारा उपलब्ध करुन द्या, अंबादास दानवेंची मागणी, तर अनेक जिल्ह्यात ४५ दिवस पुरेल एवढा चारा, मंत्री विखे पाटलांचा दावा
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपी मुलाचे वडील विशाल अगरवाल यांच्यासह आतापर्यंत ७ जणांना अटक
मुंबईतील नालेसफाईबाबत मनपा आयुक्तांनी श्वेतपत्रिका काढावी, भाजप नेते आशिष शेलार यांची मागणी तर उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळातील कारभारावर शेलारांचं बोट
नागपुरात जातीचे खोटे दाखले बनवून नामांकित शाळांमध्ये प्रवेश, आरटीई अन्वये प्रवेश घेणाऱ्या १९ पालकांविरोधात गुन्हा दाखल
अग्रवालांच्या मुजोरीचा नवा पुरावा, दोन पुणेकरांचा जीव घेणारी पोर्शे कार नोंदणीशिवायच रस्त्यावर, पुणे आरटीओच्या माहितीनंतर पितळ उघडं, तर विरोधी पक्षाकडून अपघाताच्या न्यायालयीन चौकशीची मागणी