(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 30 July 2024 : ABP Majha
अजित पवारांनी वेशांतर करून केलेल्या कथित दिल्लीवारीवर आता मविआ नेत्यांनी हल्लाबोल केलाय. यातून दहशतवादी, अतिरेक्यांनाच प्रेरणा मिळालीय अशी टीका खासदार राऊत आणि सुप्रिया सुळेंनी केलीय. या प्रकरणाची एनआयए चौकशी करा अशी मागणी राऊतांनी केलीय, तर एअरलाईन आणि मुंबई दिल्ली या दोन्ही विमानतळांची चौकशी करा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केलीय.
पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी अजित पवारांवर तुफान टोलेबाजी केलीये. राज्याला आग लागल्यावर ४० जणांना घेऊन पळून गेलेला बिबट्या आता परत येऊन आग विझविणाऱ्या चिमण्यांची शिकार करण्याच्या तयारीत आहे. अशा शब्दात उत्तम जानकर यांनी अजित पवारांना टोला लगावलाय. तसंच त्यांच्या याच टोलेबाजीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय.
दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या नाशिक मधील गोदावरी नदी पात्रात थेट सांडपाणी गोदावरी नदीत सोडण्यात येतंय. त्यामुळे गोदावरी नदी प्रदुषित होत चाललीये. त्याचं कारण नाशिक शहरातील गोदापार्क परिसरातून हे सांडपाणी थेट गोदावरी नदीपात्रात सोडलं जातंय. त्यामुळे आता प्रशासन अलर्टवर आलंय. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी नदी स्वच्छ करण्याचे आदेश दिले आहेत. तर कोटींचा निधी खर्च करून गोदावरीचे प्रदूषण रोखण्यात प्रशासन अपयशी पडलंय का असाही सवाल आता विचारला जातोय. तसंच गोदावरीत सोडलेल्या सांडपाण्याबाबत आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आलेत.