TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha
मुंबईत आज हवामान खात्याकडून यलो अलर्ट जाहीर, काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे वाहतूक कोंडी, बोरिवली कडून वांद्रे च्या दिशेने जाणारा मार्गावर गोरेगाव ते विलेपार्ले दरम्यान वाहनांच्या रांगा.
मुंबई लोकल नेहमीप्रमाणे उशिराने, मुंबईत सुरु असलेल्या पावसाचा रेल्वे सेवेवर आजही काहीसा परिणाम, तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक उशिराने सुरु.
मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची रिपरिप सुरु , मध्यरात्री विश्रांती घेतल्यानंतर पहाटेपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात.
मुसळधार पावसाने कल्याण मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुडघाभर पाणी, त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या साठ्यात वाढ, ७ धरणांमध्ये ४७.२९ टक्के पाणीसाठा.
मराठवाड्यातील जायकवाडी धरणात केवळ 4.13 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक, धरण क्षेत्राक अपेक्षित पाऊस न झाल्याने पाणीपातळीत वाढ होत नसल्याचं चित्र.
महाबळेश्वर कोयना परिसरात धुव्वाधार पाऊस, कोयना धरण क्षेत्रात 236 मिलीमिटर पावसाची नोंद, कोयना धरणात सध्या 60.50 टीएमसी पाणीसाठा.