TOP 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा: 29 May 2024
पालघर मालगाडी अपघाताचा फटका उपनगरीय सेवेला, डहाणू ते विरार लोकलसेवा पूर्णपणे ठप्प, पहाटे कामावर जाणाऱ्यांचे कमालीचे हाल
घोटाळ्यांचे जप्त केलेले पैसे गरिबांना वाटणार, १० वर्षात घोटाळ्यांचे २ हजार २०० कोटी केेले जप्त...निकालाआधी एबीपी नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती...
मोदींना गरिबांसाठी नव्हे अदानींना मदत करण्यासाठी देवानं पाठवलं, राहुल गांधींचं मोदींवर शरसंधान...निवडणुकीनंतर ईडीच्या चौकशीसाठी तयारी करत असल्याचाही टोला..
गांधी परिवारालाही संकटात मदत करत आलोय...तब्येत बिघडल्यावर सोनियांसाठी विशेष विमान पाठवलं...एबीपी नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत मोदींचं वक्तव्य...
ससूनमधल्या ब्लड सॅम्पल फेरफारप्रकरणी चौकशी समितीच्या अध्यक्षा पल्लवी सापळेच वादात...भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचं सांगत मविआच्या नेत्यांनी केला नियुक्तीला विरोध...
मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून शिवाजीराव नलावडेंना उमेदवारी, राष्ट्रवादीच्या निर्णयाने महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता.
कोस्टल रोडला कोणताही धोका नाही, कोस्टल रोडच्या गळतीच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्याची ग्वाही...तर भ्रष्ट राजवटीनं कामाचा वेग कमी केला, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात, आजपासून फडणवीस वाराणसी दौऱ्यावर, फडणवीसांचा वाराणसीमध्ये रोडशो होणार.