Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | ABP Majha | 13 March 2025
Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | ABP Majha | 13 March 2025
Sanjana Ghadi : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) घवघवीत यश मिळवले होते. तर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुतीला (Mahayuti) पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर विधानसभा निडवणुकीत (Vidhan Sabha Election) महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. यानंतर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला (Shivsena UBT) गेल्या काही दिवसांपासून एका मागे एक धक्के बसत आहेत. आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्ता संजना घाडी (Sanjana Ghadi) आणि त्यांचे पती संजय घाडी (Sanjay Ghadi) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shiv Sena Shinde Faction) प्रवेश करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला ठाकरेंचे शिवसेनेला शिंदे गटाने आणखी एक मोठे खिंडार पाडल्याचे पाहायला मिळत आहे.
संजना घाडी या मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाच्या एक महत्त्वाच्या नेत्या मानल्या जातात. त्या माजी नगरसेविका देखील राहिलेल्या आहेत. त्या शिवसेनेच्या उपनेते असून काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाकडून प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत संजना घाडी यांचे नाव नव्हते, त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र अगदी शेवटच्या क्षणी संजना घाडी यांचे नाव प्रवक्तेपदी जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे देखील संजना घाडी या नाराज असल्याचे बोलले जात हो






















