Dapali Shivshrushti: दापोलीतील शिवसृष्टी उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला ABP Majha
युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर असून यावेळी ते विविध कामांचं उद्घाटन, भूमिपुजन आणि सभा घेणार आहेत. मुख्य म्हणजे शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या दापोली येथील शिवसृष्टीचे उद्घाटन अखेर 30 मार्च रोजी होणार आहे. जिल्हा माहिती कार्यालयानं आदित्य ठाकरे यांचा संभाव्य दौरा जाहिर केला असून त्यामध्ये कसा उल्लेख करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे 28 ते 30 मार्च 2022 दरम्यान कोकणातील रायगड, रत्नागिरी आण सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी ते 29 आणि 30 मार्च दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा, गणपतीपुळे, गुहागर, चिपळूण, दापोली या तालुक्यांमध्ये भेटीगाठी करणार आहेत.



















