Hingoli Crime : पोलीस अधिकाऱ्याची पोलिसांची मुलेच 'वॉन्टेड' आरोपींचे चौकाचौकात बॅनर
Hingoli Crime : हिंगोली शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढू लागली आहे. आता चक्क पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याची दोन मुले हिंगोली पोलीसांनी वॉन्टेड घोषित केली आहेत. यांच्यासह अन्य दोन आरोपींचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. हिंगोली शहरांमध्ये चार आरोपी वॉन्टेड असल्याचे बॅनर हिंगोली पोलिसांच्या वतीने लावण्यात आलेला आहे. हिंगोली शहरातील चौकाचौकांमध्ये चे बॅनर लावण्यात आले आहे या आरोपींची माहिती देणाऱ्यांना पोलिसांच्यावतीने बक्षीस सुद्धा देण्यात येणार असल्याचे या बॅनर मध्ये नमूद करण्यात आले आहे. या चारही आरोपींच्या विरोधात हिंगोली ग्रामीण पोलिसात 307 आणि ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल आहे
महत्त्वाच्या बातम्या




















