Thane Railway Heavy Rain : ठाणे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी, ठाणे रेल्वे स्थानकावरून लोकल रद्द
Thane Railway Heavy Rain : ठाणे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी, ठाणे रेल्वे स्थानकावरून लोकल रद्द
गरज असेल तरच बाहेर पडा, मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन
मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतुकही बाधित झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.






















