Thackeray vs Shinde : महाविकास आघाडीला शिंदे सरकारचा आणखी एक दणका ABP Majha
महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या विविध योजनांना स्थगिती दिली जात असताना शिंदे सरकारने महाविकास आघाडीला आणखी एक दणका दिलाय. सामाजिक न्याय विभागाच्या सहाशे कोटींच्या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अंगणवाड्या, गटई स्टॉल योजना, अपंग व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय्य, अनुसूचित जातीच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य यांसारख्या अनेक विशेष सहाय्य योजना अंमलात येतात. त्यानुसार २०२२-२३ अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांना शिंदे सरकारने स्थगिती देऊन त्यांचा फेरआढावा घेण्याचे परिपत्रक जारी करण्यात आलंय..






















