(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Surendra Agarwal Special Report : कार अपघात प्रकरणात सुरेंद्र अगरवालला अटक का?
Surendra Agarwal Special Report : कार अपघात प्रकरणात सुरेंद्र अगरवालला अटक का?
Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल याला 28 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. चालकाला डांबून ठेवणं, दबाव टाकणे, जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. तसेच सीसीटीव्हीशी छेडछाड केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. आता पुणे सत्र न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.
जेव्हा अपघात घडला त्यावेळी सुरेंद्र अगरवाल याने त्याच्या नातवाला वाचवण्याचा प्रयत्न केला. गाडी तू चालवत असल्याचं पोलिसांना सांग असं त्याने ड्रायव्हर गंगाराम पुजारी याला सांगितलं. तसेच सुरेंद्र अगरवाल याने ड्रायव्हरला दोन दिवस डांबून ठेवल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.
या आधी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल यांची एकत्रित चौकशी करायची आहे, त्यामुळे सुरेंद्र अगरवालला पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी केली होती.