OBC Reservation : सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी अपेक्षित, ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर शिक्कामोर्तब?
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण मिळण्याची चिन्हं निर्माण झालीत आणि त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अपेक्षित आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य मागासवर्ग आयोगानं बनवलेल्या अहवालात ओबीसींची ३२ टक्के लोकसंख्या वैध ठरवण्यात आलीय. आयोगाच्या सकारात्मक अहवालामुळे ओबीसींना ५० टक्क्यांच्या मर्यादेत राहून २७ टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. ओबीसींच्या आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणं अपेक्षित आहे. यावेळी राज्य सरकारच्या वतीनं या अहवालातील निष्कर्ष न्यायालयासमोर मांडण्यात येणार आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं याकडे लक्ष लागलं आहे.






















