HSC Exams : अहमदनगरमध्ये इंग्रजी विषयाची कॉपी न दिल्याने एजंटला मारहाण Ahmednagar
अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रावर इंग्रजी विषयाची कॉपी न दिल्याने एक एजंटला मारहाण झाल्याची चर्चा आहे... ‘हमखास उत्तीर्ण होण्याची गॅरंटी’ असलेल्या या केंद्रावर मुंबई-पुण्यासह राज्यभरातील विद्यार्थी प्रवेश घेतात... हे विद्यार्थी तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यापर्यंतही गेले होते... मात्र संस्थाचालकांनी ‘सेटलेमंट’ करुन वादावर पडदा टाकल्याची माहिती मिळतेय... या निमित्ताने पाथर्डीतील परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्तीचा फज्जा उडाल्याचं स्पष्ट झालंय... विशेष म्हणजे प्रवेशापासून पास होण्याच्या हमीपर्यंत एजंटांनी मुक्त व्यवहार झाल्याची मोठी चर्चा आहे... सरकारच्या कॉपीमुक्त अभियानाला एबीपी माझाची साथ आहे... म्हणून माझा हे प्रकरण लावून धरणार आहे...



















