एक्स्प्लोर

Special Report Mahayuti Seat Sharing : विधानसभा जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच ABP Majha

Special Report Mahayuti Seat Sharing | विधानसभा जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच ABP Majha    आगामी लोकसभा (Lok Sabha Election 2024) आणि विधानपरिषद (Legislative Council Elections) निवडणुकांनंतर आता सर्वच पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Election 2024 Updates) कंबर कसली आहे. अद्याप निवडणुकांची (Election 2024) घोषणा झालेली नाही, पण तरिदेखील जागावाटपावरुन सर्वच पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सक्रिय झाले आहेत. महायुतीत (Mahayuti) सध्या जागावाटपाची चर्चा प्राथमिक टप्प्यात आहे. दरम्यान, आगामी विधानसभेत शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Group) 100 जगांसाठी आग्रही असेल, अशी माहिती मिळत आहे.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं (Shiv Sena) शनिवारी 113 विधानसभा मतदारसंघात 46 विधानसभा प्रभारी आणि 93 विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती केली. यासोबतच शिवसेना विधानसभा निवडणुकीत 288 पैकी किमान 100 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचा संदेशही शिंदे यांनी मित्रपक्षांना विशेषतः भाजपला दिला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अवघे दोन महिने शिल्लक असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी कोणतीही कमतरता राहू नये, म्हणून शिंदे यांनी आपल्या नेत्यांची फौज तयारीसाठी उतरवली आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी बोलताना नारायण राणे यांनी भाजपनं आगामी निवडणूक एकट्यानं सर्वच्या सर्व 288 जागांवर लढावी, असं वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्याच्या आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.   विधानसभा निवडणुकीत शिंदेंची मुंबईवर नजर  जो मुंबईचा गड राखतो, तिच आघाडी महाराष्ट्राच्या सत्तेच्या खुर्चीवर बसते, असं राज्याच्या राजकारणात म्हटलं जातं. त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीनं मुंबईवर लक्ष केंद्रीय करण्यास सुरुवात केली आहे. अशातच मुंबई म्हणजे, शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून आता शिवसेनेत दोन गट पाहायला मिळत आहेत. एक शिंदेंचा आणि दुसरा ठाकरेंचा. लोकसभा निवडणुकीत तर मुंबईकरांचा कौल ठाकरेंना मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, आता विधानसभेत मुंबईकर कोणाच्या बाजूनं उभे राहणार, हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. अशातच आता शिंदेंनीही मुंबईवर विशेष लक्ष केंद्रीय केलं आहे.   मुंबईतील 18 जागांसाठी शिंदेंकडून प्रभारींची निवड  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील 36 पैकी 18 जागांसाठी निवडणूक प्रभारींची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये माजी नगरसेवक कमलेश राय (चांदिवली, कलिना), मिलिंद देवरा (वरळी, शिवडी), यशवंत जाधव (भायखळा), रवींद्र वायकर (जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, परभणी, गंगाखेड), राहुल शेवाळे (चेंबूर, अणुशक्ती नगर, माहीम, धारवी), शिशिर शिंदे (भांडुप पश्चिम, कुर्ला, विक्रोळी, मानखुर्द) यांचा समावेश आहे. तसेच, नुकतेच शिंदे सेनेत दाखल झालेल्या संजय निरुपम (अंधेरी पूर्व, मालाड पश्चिम, मागाठाणे) यांच्याकडेही प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे. यावरुन एकंदरीत शिंदेंनी ठाकरेंकडून मुंबईचा गड हिसकावून घेण्यासाठी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 9 PM 07 October 2024
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 9 PM 07 October 2024

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
Bopdev Ghat Incident : आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 9 PM 07 October 2024Top 100 Headlines : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 09 PM : 07 October 2024 ABP MajhaRaj Thackeray VS Narhari Zirwal : राज ठाकरेंना नरहरी झिरवाळांचं प्रत्युत्तर #abpमाझाSanjay Shirsat on Uddhav Thackeray : पहिली अडीच वर्षे सेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास भाजपची तयारी होती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
Bopdev Ghat Incident : आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
मोठी बातमी! विधानसभा निवडणुकांचा परिणाम; राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
मोठी बातमी! विधानसभा निवडणुकांचा परिणाम; राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर
यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर
Jalna News : जालन्यात काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना राडा, दोन गटात जोरदार घोषणाबाजी
जालन्यात काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना राडा, दोन गटात जोरदार घोषणाबाजी
Embed widget