(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sonali Kulkarni on Election : यंदाची निवडणूक संभ्रमित करणारी, सोनाली कुलकर्णींनी दिला सल्ला
Sonali Kulkarni on Election : यंदाची निवडणूक संभ्रमित करणारी, सोनाली कुलकर्णींनी दिला सल्ला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आज सकाळी आकुर्डी येथील ज्ञान प्रबोधिनी मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. VO: सोनाली कुलकर्णी ने रांगेत उभा राहून सकाळी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी होणारी विधानसभा निवडणूक ही संभ्रमित करणारी आहे. खूप सारे राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार आहेत त्यामुळ, तुम्ही तुमच्या घरच्यांची चर्चा करून योग्य उमेदवाराला नक्की मतदान करा असा आवाहन सोनाली कुलकर्णी हिने केले आहे.
हे ही वाचा....
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सध्या महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट लढत होत आहे. मराठा आंदोलक व उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नावाचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला जात आहे. अर्थातच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जरांगे पाटील यांच्या नावाचा वापर करत महायुती व भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला जात आहे. त्याअनुषंगाने अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार स्टेजवरुन जरांगे पाटील यांचा सातत्याने उल्लेख करतात, त्यासंदर्भाने बोलताना अजित पवार म्हणाले की, जरांगे पाटील गेले अनेक वर्ष समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांचा त्यांच्या पद्धतीने प्रयत्न सुरू आहे. सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं. आपल्या इथे तो मुद्दा जास्त प्रकर्षाने समोर आला, हे इथे निजामशाही होती अनेक वर्ष निजामशाही असल्यामुळे इथे कुंणबी प्रमाणपत्र दिले गेले नव्हते. जे विदर्भातल्या अनेकांना मिळालं, जे कोकणातल्या अनेकांना मिळालं, जे उत्तर महाराष्ट्रातल्या अनेकांना मिळालं. प्रश्न फक्त मराठवाड्याचा राहिला आहे, त्यांनी आंदोलन केल्यानंतर आम्ही कागदपत्रं तपासून त्या ठिकाणी काहींना कुणबी प्रमाणपत्र दिले आहेत. त्यामध्ये आपण जवळपास काही लाख लोकांना तशाप्रकारचे प्रमाणपत्र दिले आहेत. त्या लोकांना फायदा झाला असून ते ओबीसीमधून आरक्षण मिळाल्यामुळे त्यांना लाभ मिळत आहे, असे अजित पवार यांनी म्हटले