Solapur Barshi Scam : फटेचा 'विशाल' गेम; दिखावा करुन दिग्गजांना भुलवलं! काय आहे संपूर्ण प्रकरण?
Solapur Barshi Froud Case : बार्शीच्या स्कॅम प्रकरणात सध्या अनेक चर्चा सुरु आहेत. बार्शीतल्या प्रत्येक चौकात, चहाच्या टपऱ्यांवर, दुकांनामध्ये केवळ एकच विषय सुरु आहे कोणाचे किती बुडाले. यामध्ये प्रामुख्याने राजकारणी, डॉक्टर्स, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक यांची नावे घेतली जात आहेत. अर्थात यापैकी अद्याप एक ही व्यक्ती तक्रार द्यायला आतापर्यंत तरी पुढे आलेली नाहीये. मात्र त्यांच्या नावाच्या चर्चा बार्शीत रंगतायात. आरोपी विशाल फटे हा गुंतवणुकदारांनी कोणत्याही मार्गाने पैसे दिले तरी स्विकारायचा. त्यामुळे ज्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी काळे धन जमा केले आहे. ते दुप्पट करण्याच्या आमिषाने विशालकडे दिले होते. हा आकडा शेकडो कोटींचा असल्याची चर्चा सध्या बार्शीत सुरु आहे.






















