Shriniwas Pawar : 4 जूनला निकाल लागल्यानंतर अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील - श्रीनिवास पवार
Shriniwas Pawar : 4 जूनला निकाल लागल्यानंतर अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील - श्रीनिवास पवार चार जूनला निवडणुकीचा निकाल लागला की अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील अस अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी म्हटलय. शनिवारी बारामतीतील सभेत बोलतांना
अजित पवारांनी चार जुननंतर सुप्रिया सुळेंच्या प्रचारात उतरलेल्या पवार कुटुंबातील कोणत्यही व्यक्ती दिसणार नाहीत, जर दिसल्य तर आपण मिशा काढू अस जाहीर सभेत म्हटल होतं. त्याला श्रीनिवास पवारांनी उत्तर दिलय. त्याचबरोबर कुटुंबातील या राजकिय संघर्षामुळे अजित पवारांच्या आई बारामती सोडून पुण्याला आपल्या बहिणीकडे रहायला गेल्याच श्रीनिवास पवार म्हणालेत. अजित पवारांनी टोकाची भूमिका घातल्याने आपणच अजित दादांची साथ सोडल्याच श्रीनिवास पवार म्हणालेत.





















