Shooter Arya Borse : नेमबाज आर्या बोरसे सलग दुसऱ्या वर्षी ज्युनियर गटाच्या आरआर लक्ष्य
नाशिकची नेमबाज आर्या बोरसेनं सलग दुसऱ्या वर्षी ज्युनियर गटाच्या आरआर लक्ष्य कपवर आपलं नाव कोरण्याचा पराक्रम गाजवला आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक सुमा शिरुरच्या वतीनं या स्पर्धेचं पनवेलमध्ये आयोजन केलं होतं. ज्युनियर गटाच्या अंतिम फेरीत आर्या बोरसेनं महाराष्ट्राच्याच पार्थ मानेचा १७-४ असा पराभव केला. लक्ष्य कप नेमबाजीचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा ज्युनियर आणि सीनियर गटातही मुलींनीच विजेतेपदाचा मान मिळवला. ओडिशाची आंतरराष्ट्रीय नेमबाज श्रीयंका सदांगीनं सीनियर गटात लक्ष्य कपवर आपलं नाव कोरलं. तिनं कर्नाटकच्या युक्ती राजेंद्रचा १६-१२ असा पराभव केला. पनवेलच्या कर्नाळा स्पोर्टस अॅकॅडमीतल्या नेमबाजी रेंजवर लक्ष्य कपचं आयोजन करण्यात आलं होतं.






















