Shiv Sena MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेप्रकरणी पुढची सुनावणी 13 ऑक्टोबरला
आता बातमी, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सत्तासंघर्षाची... आमदार अपात्रतेचा निर्णय यावर्षी लागणं कठीण असल्याची माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिलीय. सुनावणीच्या संभाव्य वेळापत्रकात कागदपत्रं तपासणं, साक्ष नोंदवणं तसेच उलट तपासणीचा समावेश आहे. त्याचसोबत, डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन असल्यामुळे, या काळात सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे. यामुळे संबंधित प्रक्रियेला तीन महिन्यांचा वेळ लागण्याची शक्यता असल्याने, आमदार अपात्रतेबाबतचा निकाल यावर्षी लागण्याची शक्यता कमीय. या सुनावणीत सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाने केलीय. मात्र, त्याला शिंदे गटाने विरोध दर्शवलाय. याबाबतची पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला होणार असून, हा खटला कसा चालवला जाईल, याचा रोडमॅप विधानसभा अध्यक्ष येत्या दोन ते तीन दिवसांत देणार आहेत.






















