Sharad Pawar यांना आणखी एक मोठा धक्का बसणार? काही आमदार काँग्रेसमध्ये जाणार?
Sharad Pawar यांना आणखी एक मोठा धक्का बसणार? अजितदादांसोबत कोण कोण जाणार?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटांतील एक मोठा गट काँगेस मध्ये जायच्या तयारीत आहे, असा दावा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. शरद पवारांच्या पक्षातील या आमदारांचे मागील काही दिवसांपासुन सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असंही तटकरे म्हणाले आहेत. पवारांच्या पक्षातला एक मोठा गट नाराज आहे, या गटातील नेते अनेक दिवसांपासून सोनिया गांधींना भेटण्यासाठी त्यांची वेळ मागतायेत, असं ते म्हणाले. तटकरेंचा हा दावा खरा असल्यास ४ जून रोजी लोकसभेच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला कमी जागा मिळाल्या, तर मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो असं राजकीय जाणकार सांगतायेत.






















