Sharad Pawarकार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नाला सप्त्नीक उपस्थिती, पत्रिकेनुसार लग्नाचा मुहर्त
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सामान्य कार्यकर्त्यांशीही नाळ जोडून ठेवतात, याची प्रचिती सोलापूरच्या मंगळवेढ्यात आलीय. मंगळवेढ्याच्या मरावडे या गावात लतिफ तांबोळी यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला शरद पवार सपत्नीक उपस्थित राहिले होते.लतिफ हे पहिल्यापासून पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून सोलापूर जिल्ह्याला परिचित आहेत. आपली कन्या हिना हिच्या विवाहाची पत्रिका काही दिवसापूर्वी लतिफ यांनी पवार यांना देऊन लग्नाला येण्याची विनंती केली होती. महत्त्वाचं म्हणजे, लतिफ यांनी शरद पवार यांची कार्यक्रमपत्रिका पाहूनच विवाहाचा मुहूर्त आणि वेळ ठरवली होती. अशातच लग्न सोहळ्याआधीच शरद पवार हे हेलिकॉप्टरने सपत्नीक लग्न सोहळ्याला उपस्थित राहिले.




















