(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SHAHAJI BAPU ON UDHAV:ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत,ही काळ्या दगडावरची
SHAHAJI BAPU ON UDHAV:ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत,ही काळ्या दगडावरची
शिंदे सेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी केली आहे. उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं आहे ही गोष्ट सातत्याने ठाकरे सेनेच्या नेत्यांच्या तोंडून बाहेर येत असते त्यामुळेच महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदावरून उलट सुलट दावे होत असतात. याबाबत शरद पवार यांनी यापूर्वीच स्पष्टता केल्याने उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नाला तडा जात असल्याचे दिसत आहे. अशावेळी संजय राऊत सातत्याने उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे सांगत असताना शिंदे सेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना ते कधीही पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीस ही काळया दगडावरची रेघ असल्याचा टोला लगावला आहे . जागा वाटपात आम्हाला एकही जागा देऊ नका पण मला मुख्यमंत्री करा असेही उद्या उद्धव ठाकरे म्हणताना दिसतील असाही टोला शहाजी बापूंनी लगावला . गेली अडीच वर्ष महाराष्ट्रातली जनता संजय राऊत यांचे एकपात्री नाटक बघून वैतागली असल्याने आता तू काय बोलणार याकडे कोणीही लक्ष देत नाही असा टोला संजय राऊत यांना लगावला.