Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेसच्या चाचणीची दृश्य ड्रोन कॅमेरात कैद : ABP Majha
10 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई शिर्डी आणि मुंबई सोलापूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात येणार आहे. मात्र, त्याआधी ही वंदे भारत एक्सप्रेस अतिशय अवघड अशा पश्चिम घाटातील भोर घाट आणि थळ घाटात बँकर इंजिन न लावता चालवून चाचण्या घेण्यात येत आहेत. इतिहासात पहिल्यांदाच एखादी गाडी बँकर किंवा कोणतेही इंजिन न लावता या दोन्ही घाटांमध्ये धावली. मात्र वंदे भारत एक्सप्रेसने आज जरी या दोन्ही घाटांमध्ये चढाई केली असली तरी अजून काही दिवस या एक्सप्रेसच्या चाचण्या घेण्यात येतील. ज्यावेळी आज ही गाडी कसारा येथील थळ घाटात धावली त्यावेळी घाटातून चालत असताना या गाडीचे विहंगम असे दृश्य कुणाल खैरनार या रेल फॅनने आपल्या drone कॅमेरात कैद केलंय.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
