Sanjay Raut on ST Strick : महाराष्ट्राला आग लावण्याचे प्रयत्न आमरावतीपासून एसटी संपापर्यंत चालले आहे
Sanjay Raut on ST Strick : एसटी संपामध्ये तेल ओतण्याचं काम कोण करतेय हे सर्वांना माहिती आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये बैठक झाल्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, 'एसटी कर्मचाऱ्यांविषयी सर्वांना सहानभूती आहे. पण त्यातही आग लावली जातेय. आग कोण लावतेय, हे सर्वांना माहित आहे. ' शरद पवार यांच्यासबोत अनेक विषयांवर चर्चा झाली. महाराष्ट्रातील, राजकीय आणि एसटी संपासह विविध विषयांवर शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली. परमबीर सिंहांबाबत शरद पवार यांच्यासोबत चर्चा करावी, इतका मोठा आणि गंभीर विषय नाही. राज्यात इतरही महत्वाचे विषय आहेत. त्या विषयांवर शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
