Samruddhi Bus Accident :बुलढाण्यातील अपघात मद्यपान केल्यामुळे?फॉरेन्सिक चाचणीत आढळलं मद्य :ABP Majha
३० जून आणि १ जुलैच्या मध्यरात्री समद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात झाला, यामध्ये २५ हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला. हा अपघात चालकानं मद्यपान केल्यानं घडल्याची शक्यता आता समोर आली आहे. कारण बसचालक शेख दानिशच्या रक्तात कायदेशीर प्रमाणापेक्षा ३० टक्के अधिक अल्कोहोल आढळला आहे. अमरावतीमधील रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीनं दिलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. अधिक महत्त्वाचं म्हणजे चालकाच्या रक्ताचे नमुने १ जुलै रौजी दुपारी एक वाजता घेण्यात आले. म्हणजेच अपघात झाल्यावर जवळपास बारा तासांनी नमुने घेण्यात आले. एवढ्या वेळात रक्तातील अल्कोहोलचं प्रमाण कमी होतं. म्हणजेच, रक्तात जेवढं आढळलं, त्याहून कित्येक पटीनं जास्त मद्य या चालकानं प्राशन केलं होतं, अशी शक्यता तपास अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. आणि म्हणूनच, हा अपघात समृद्धी महामार्गामुळे नव्हे तर मद्य प्राशन करून बस चालवल्यानं घडल्याची शक्यता आहे.