Sangita Wankhede vs Manoj Jarange : थेट शरद पवारांचं नाव घेत संगीता वानखेडेंचे मनोज जरांगेवर आरोप
Sangita Wankhede vs Manoj Jarange : थेट शरद पवारांचं नाव घेत संगीता वानखेडेंचे मनोज जरांगेवर आरोप मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आज आणखी एक मोठं खिंडार पडलंय. जरांगे यांच्या आंदोलनातील मराठा आरक्षण कार्यकर्त्या संगीता वानखेडे यांनी आज जरांगेंवर जोरदार तोफ डागली. जरांगे यांना आंदोलनादरम्यान शरद पवारांचा फोन येत होता, आणि पवार सांगतील तसंच जरांगे करतात असा आरोप संगीता वानखेडे यांनी केलाय. या आंदोलनाला शरद पवारांनीच पैसा पुरवल्याचा आरोपही त्यांनी केलाय. एकीकडे जरांगेेचे माजी सहकारी अजय बारसकर यांनी केलेल्या आंदोलनाचा धुरळा उठला असतानाच आता या नव्या आरोपांमुळे, त्यातही थेट शरद पवारांचं नाव घेतल्याने खळबळ माजलीय.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
