Rohit Pawar vs Ajit Pawar : अजित पवारांचं कुटुंब वेगळं, अजित पवार गटात काहीच अलबेल नाही : रोहित पवार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअजित पवार यांच कुटुंब वेगळ आहे आणि शरद पवार यांच कुटुंब वेगळ आहे. अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवारांनी दिलीय. तसंच अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे लहानपणापासून जवळ आहेत. त्यामुळे त्या भावूक होतात. असंही रोहित पवार म्हणालेत.
तसंच छगन भुजबळांवरही रोहित पवारांनी टीका केली. भुजबळ ज्या पक्षात आहेत, त्यांच्याच पक्षातील लोक हे पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.
माझ्याकडे कोणतंही पद नसल्यानं निर्णय घेता येत नाही, जयंत पाटलांचं काम चांगलं, पण...नेमकं काय म्हणाले रोहीत पवार?
Rohit Pawar : अनेकांना पक्षांसोबत येण्याची इच्छा असते. पण माझ्याकडे कोणतही पद नसल्याने मला निर्णय घेता येत नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहीत पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केले. जयंत पाटील (Jayant Patil) चांगल काम करत आहेत. पण काही सेलममध्ये काम करण्याची गरज आहे. त्यावर वरिष्ठ निर्णय घेतील असे रोहित पवार म्हणाले. पद असो किंवा नसो, मुद्दा महत्वाचा असेल तर त्यावर बोललं पाहिजे असंही ते म्हणाले.