Resident Doctors Strike : निवासी डॉक्टरांचा संध्याकाळी 5 वाजल्यापासून संप ABP Majha
Resident Doctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा आजपासून संप, संध्याकाळी 5 वाजल्यापासून निवासी डॉक्टर संपावर
निवासी डॉक्टर आजपासून राज्यव्यापी संपावर जाणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीत आश्वासनांची पूर्तता न झाल्याने डॉक्टरांनी संपाची हाक दिलीय. संध्याकाळी ५ वाजल्यापासून निवासी डॉक्टर संपावर जातील. संपादरम्यान निवासी डॉक्टरकडून ओपीडी सेवा दिली जाणार नाही, मात्र अत्यावश्यक सेवा सुरुच राहणार आहेत. दरम्यान मुंबई महापालिका अखत्यारित येणाऱ्या रुग्णालयातील निवासी डॉक्टर या संपात सहभागी होणार नसल्याने सेवांवर फारसा परिणाम दिसणार नाही. विद्यावेतन वेळेत मिळावे आणि राहण्याची हॉस्टेल्सची दूरवस्था याबाबत हा संप होतोय.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
