Republic Day 2022 : 'अबाईड विथ मी ' गाण्याचा इतिहास काय आहे? : ABP Majha
यंदाच्या बीटींग द रिट्रीट सोहळ्यात गेले अनेक वर्षांपासून सुरू असलेली एक परंपरा मोडीत निघणार आहे. दरवर्षी बीटींग द रिट्रीट सोहळ्याची सांगता महात्मा गांधींच्या आवडत्या गाण्यानं म्हणजेच अबाईड विथ मी या धुननं व्हायची मात्र यंदा या समारंभाची सांगता सारे जहाँ से अच्छा या गाण्याच्या धुननं होणार आहे. भारतीय लष्कराकडून या कार्यक्रमाची विवरण पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये बीटींग द रिट्रीट गाण्याचा समावेश नसल्याचं दिसून आलं. या विवरणपत्रानुसार कार्यक्रमात २६ गाण्यांच्या धुन वाजणआर आहेत. विजय घोष, स्वदेशी, अमर चट्टान, गोल्डन अॅरोज कदम कदम बढाए जा, ड्रमर्स कॉल, ए मेरे वतन के लोगो अशा अनेक धुनचा समावेश आहे. काँग्रेसनं मात्र यावर सडकून टीका केली आहे. महात्मा गांधीचा वारसा संपवण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आलेय.



















